‘मी चंचल होऊन आले’ या आली त्यांच्या जीवनगाण्यानी आनंदयात्री मंगेश पाडगावकरांना स्वर श्रद्धांजली वाहण्यात आली.

सावंतवाडी संगीत मित्र मंडळ आणि श्रीराम वाचन मंदीर, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरच्या हॉलमध्ये मंगेश पाडगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाला वाचन मंदिरचे अ‍ॅड. अरूण पणदुरकर, संगीत मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद चोडणकर, सचिव किरण सिद्धये तसेच सदस्य मंडळी व रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती.

अ‍ॅड. अरूण पणदुरकर यांनी मंगेश पाडगावकरांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली. संगीत मित्र मंडळाच्या सदस्यांनी मंगेश पाडगांवकर यांची गीते गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहीली . पाडगांवकरांच्या गीतांचे निवेदन विनय सैदागर यांनी केले. निवेदन सुंदर शब्दांत व ओघवते होते. गीतांमध्ये सुरुवातीला ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे गीत अरुण सरवटे यांनी गायले.

त्यानंतर ‘दिवस तुझे हे फुलायचे’-मिना उकिडवे, ‘तुला ते आठवील का सारे’-भाग्यश्री कशाळीकर, ‘माझे जीवन गाणे’- कु. मुग्धा सौदागर, ‘हात तुझा हातातून धुंद ही हवा’- किरण सिद्धये व पल्लवी बर्वे, ‘विसरशील तू सारे’-छाया शिवशरण, ‘मी चंचल होऊन आले’- स्नेहा वझे, ‘शुक्रतारा मंद वारा’-किरण सिद्धये व सोनिया सामंत, ‘जेव्हा तुझ्या बटांना’-किरण सिद्धये, ‘निज माझ्या नंदलाला’-डॉ. मानसी वझे, ‘शब्दा वाचून कळले सारे’-श्रीपाद चोडणकर, ‘जाहल्या काही चूका’- सोनिया सामंत, ‘भावभोळ्या भक्तीची ही एक तारी’- कु. ऋचा कशाळीकर आणि ‘अशी पाखरे येती’ या गाण्याने श्रीपाद चोडणकर यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. मधून मधून अ‍ॅड. पणदूरकरांनी मंगेश पाडगावकरांच्या स्मृतींना उजाळा दिला. संगीत साथ : तबला-अक्षय सरवणकर, हार्मोनियम-कु. मुग्धा सौदागर, सिंथेसायजर-महेश तळगांवकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजन नाईक यांनी साऊंड सिस्टीमची चोख सेवा दिली. रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.