नगर-जामखेड रस्त्यावर सारोळा बद्दी (ता. नगर) येथे तवेरा गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात ४ जण ठार, तर १० जण जखमी झाले. रविवारी पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला. मृत व जखमी प्रवासी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील असून ते वसईहून उस्मानाबादकडे निघाले होते.
चालकाच्या डोळ्यावर झोप असल्याने त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले व चार-पाच पलटय़ा होऊन गाडी रस्त्यावरून २५-३० फूट पुढे फरफटत गेली. आतील प्रवासीही झोपेत असल्याने त्यांना सावरता आले नाही. बरेचजण गाडीच्या बाहेर फेकले गेले. त्यातच चौघांचा मृत्यू झाला. अर्चना पांडुरंग घरत (वय, ३५), वैष्णवी पांडुरंग घरत (वय, ५ दोघेही राहणार, लोणारवाडी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), भागूबाई श्रीराम सपकाळे (वय, ३५, रा. कुंभळी, ता. भूम), मीराबाई उत्तम तागडे (वय, ३५ रा. निजामवाडी, ता. भूम) अशी मृतांची नावे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2013 रोजी प्रकाशित
तवेरा उलटून चार ठार; १० जखमी
नगर-जामखेड रस्त्यावर सारोळा बद्दी (ता. नगर) येथे तवेरा गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात ४ जण ठार, तर १० जण जखमी झाले. रविवारी पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला. मृत व जखमी प्रवासी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील असून ते वसईहून उस्मानाबादकडे निघाले होते.
First published on: 07-01-2013 at 01:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tawera overturn caught in accident 4 dead