भाजपा सरकारला सत्तेवर येऊन नुकतेच नऊ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर भाजपाने देशभर मोठा कार्यक्रम हाती घेत गेल्या ९ वर्षांत काय काय केलं याबाबत माहिती दिली. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
“भाजपा मतविभाजानाचं राजकारण करतंय आणि यापुढेही करत राहील. त्यामुळे त्यावर फार प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. नऊ वर्षांत काय केलं याच्या जाहिराती त्यांनी केल्या. पण देशातील प्रॉपर्टी विकली, जीएसटीसारखा सुल्तानी कायदा आणून सर्वसामान्यांना लुटलं कसं, यावर नऊवर्षांचं व्याख्या मांडलं असतं तर देशातील वस्तुस्थिती देशासमोर आली असती”, असं नाना पटोले
हेही वाचा >> “एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”
“जीएसटीमुळे सकाळी कोलगेटपासून ते रात्री झोपेपर्यंत लोकांना टॅक्स भरावा लागतो. प्रत्येक ठिकाणी जीएसटी आहे, वीजेवर जीएसटी आहे. पंखा लावला तर त्यावरही जीएसटी आहे. सातत्याने तुमच्यावर टॅक्सचा बोजा बसवून आम्हीच विकास केलाय हा आव आणण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला. त्यांनी वस्तुस्थिती आणायला पाहिजे होती. दोन हजारांची नोट आणायची आणि त्यांनीच बंद करायची. नोटाबंदीनंतर सोने गहाण ठेवले आहेत, ही सर्व वस्तुस्थिती मांडायला पाहिजे होती. महागाईमुळे जनता जळते आहे. बेरोजगारी वाढली आहे. ही सर्व परिस्थिती मांडली असती तर खऱ्या अर्थाने विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधानांना विश्वगुरू म्हणता आलं असतं. पण खरं पाप लपवलं गेलं”, असंही नाना पटोले म्हणाले.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.