लग्नसमारंभ आटोपून गावाकडे परतणारा टेम्पो उलटून २० वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. परभणीजवळील सुरिपप्री-बोरवंड रस्त्यावर मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात जाला. गावापासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर टेम्पो उलटला.
परभणी तालुक्यातील बोरवंड येथील माणिक लोखंडे यांच्या मुलाचा विवाह वडगाव सुक्रे येथे पार पडला. सोहळा आटोपून गावातील वऱ्हाडी टेम्पोने सुरिपप्रीमाग्रे गावाकडे निघाले. बोरवंडपासून जवळच दारूच्या नशेत असलेला चालक चंद्रकांत केशव खवले याचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि भरधाव टेम्पो उलटला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या अपघातात २० वऱ्हाडी जखमी झाले. जखमींची नावे : संभा भुजंग लोडे (वय १३), दत्ता रामकिशन िहगणे (वय १३), अंगद किशन लोखंडे (वय २०), गणेश लोखंडे (वय २०), गोिवद लोखंडे (वय २५), नवनाथ अनंता ठेंबरे (वय १५), ज्ञानोबा दत्तराव खुळे (वय ६५), अनंता ग्यानोजी ठेंबरे (वय ३५), श्रीरंग यादव (वय ६०), शेख मुक्तार शेख शबीर (वय २३), ज्ञानू कारभारी लोखंडे (वय १८), माणिक संतोबा लोखंडे (वय ६५), ज्ञानोबा तुकाराम लोखंडे (वय ५०), शंकर बालासाहेब गिराम (वय १६), निवृत्ती ज्ञानोबा लोखंडे (वय ३०), अंबादास लोखंडे (वय १७), बापू खामकर (वय २५), शेख जफर शेख चाँद (वय १९), विशाल लोखंडे (वय १९, सर्व बोरवंड), व्यंकटी खटींग (महातपुरी). सर्व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमीपकी व्यंकटी खटींग व अनंता ठेंबरे या दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नांदेडला हलविण्यात आले.
जीप-मोटार अपघातात आठ जखमी
जीप व मोटार यांची समोरासमोर धडक होऊन दोन चिमुकल्यांसह आठ जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पांगरी पाटीवर हा अपघात घडला. यातील पाच जखमींना परभणीस उपचारासाठी हलविण्यात आले.
आडगाव बाजार येथून जीप (एमएच२२-१७४१) मासोळी घेऊन परभणीकडे येत होती. पांगरी पाटीवर परभणीकडून येणाऱ्या मोटारीशी (एमएच २२ सीएस ५१५) धडक होऊन जीप उलटली. या अपघातात जीपमधील म. शफी म. हनीफ, शेख बाबा शेख हमीद (आडगाव), नामदेव भाऊराव तावडे (परभणी), तर मोटारीतील दिनेश शंकरराव मगर (वय ३०), गौरी दिनेश मगर (वय २५), कांताबाई शंकरराव मगर (वय ३०), नंदिनी दिनेश मगर (वय ६) व युवराज दिनेश मगर (वय २, सर्व दौंडगाव) जखमी झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मोटारीतील सर्व जखमींना परभणी येथे पाठविण्यात आले. घटना घडल्याची माहिती महामार्ग पोलिसांना देऊनही एकही कर्मचारी घटनास्थळी वेळेवर हजर झाला नाही. सर्व सारवासारव झाल्यानंतर अपघात नेमका कोठे घडला याची माहिती घेतली जात होती.