राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख नगर परिषद क्षेत्र असलेल्या, तसेच मिनी भारत अशी ओळख असलेल्या बल्लारपूर शहराला केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून कचरा मुक्त शहर म्हणून ‘थ्री स्टार दर्जा’  देण्यात आला आहे. केंद्रीय गृह आणि नगरविकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांनी आज ही माहिती जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बल्लारपूर शहरात मोठया प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आली आहेत. बल्लारपूर शहरानजिक देशातील २९ वी सैनिकी शाळा, अत्याधुनिक क्रीडांगण, बसस्थानक, स्मार्ट पोलीस स्टेशन असा विविध विकासकामांचा नवा आयाम या शहराला मिळाला आहे.

विशेषत: नगर परिषदेच्या माध्यमातुन स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्यात आली असून, त्यासंबंधी विविध उपक्रमही राबविण्यात आले आहेत. या आधीही रेल्वे विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत बल्लारपूर येथील रेल्वे स्थानक देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक ठरले आहे.

बल्लारपूर शहराला थ्री स्टार दर्जा (कचरा मुक्त शहर) देण्यात आल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्षा सौ. मिना चौधरी, मुख्याधिकारी विपीन मुद्दा, नगर परिषदेचे सर्व नगरसेवक व अधिकारी, कर्मचारी तसेच बल्लारपूरकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The city of ballarpur has been awarded three star status by the union ministry of urban development msr
First published on: 25-06-2020 at 17:36 IST