राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण या प्रश्नाचं उत्तर शरद पवार यांनी दिलं आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आज जे काही अजित पवारांनी केलं ते काही मला नवीन नाही. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील हे सगळे जण सोडून गेले आहेत. पुढच्या दोन दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल पण मी उद्यापासून मैदानात उतरणार आहे असं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे.

शरद पवारांनी हात उंचावून दिलं उत्तर

तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला असता शरद पवारांनी हात उंचावून ‘शरद पवार’ असं उत्तर दिलं आहे. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

लोकांवर माझा खूप विश्वास आहे

माझा राज्यातील कार्यकर्त्यांवर आणि लोकांवर खूप विश्वास आहे. राजकीय पक्षांची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ता आहे. नाव, चिन्हावर हक्क सांगतील, पक्षावर दावा त्यांनी सांगितला आहे. मात्र तुमच्यात येऊन बोलण्यासाठी तर कुणी मला अडवू शकत नाही ना? असा प्रश्न शरद पवारांनी विचारत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तसंच आगामी काळात तुम्हाला राष्ट्रवादीची नवी टीम दिसेल असंही शरद पवार म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमच्या पक्षाचं चिन्ह कुठेही जाणार नाही

राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह कुठेही जाणार नाही. याची मला खात्री आहे. मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढवली तेव्हा चिन्ह होतं बैलजोडी, त्यानंतर काँग्रेस फुटल्यावर आमची खूण होती चरखा. त्यानंतर गाय वासरु हे चिन्ह होतं. चार खुणा माझ्याच आयुष्यात मी लढलो. लोक खूण वगैरे पाहात नाहीत काय काम करु शकतो उमेदवार ते पाहतात. जनतेवर माझा विश्वास आहे. मला लोकांनी १४ वेळा निवडून दिलं आहे. त्याअर्थी माझ्यावर विश्वास असावा असंही शरद पवार म्हणाले आहेत. त्यानंतर शरद पवारांना तुमच्या पक्षातला आश्वासक चेहरा कोण हे विचारण्यात आलं. ज्यावर हात उंचावून शरद पवार यांनी शरद पवार असं उत्तर दिलं. या उत्तरानंतर कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.