महाविकास आघाडीने ठिकठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. जिथे उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे, त्या उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे. आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आज उमेदवारीचा अर्ज भरला असून यावेळी महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटावर टीका केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र खेडेकर यांनी अर्ज भरला आहे. अत्यंत कठीण काळात निष्ठेने, ठामपणे पक्षाबरोबर उभं राहण्याचं काम खेडेकरांनी केलं आहे. त्यामुळे एका निष्ठवंताला संधी मिळत आहे. बुलढाणा हा शिवेसनेचा गड राहिलेला आहे. आम्ही एकट्याने असतानाही ही जागा काढलेली आहे. आता तर महाविकास आघाडी आमच्याबरोबर आहे.
“मला विश्वास आहे की बुलढाण्याची जागा आम्ही मताधिक्याने काढू. एकदा विकलेली वस्तू दुकानदार परत घेत नाहीत. मग विकलेले नेते लोक परत कसे काय घेतील? त्यामुळे विकलेला माल आता पुन्हा विकला जाणार नाही. आता पुन्हा एकदा निष्ठावंताला संधी दिली आहे. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
हेही वाचा >> बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री
बुलढाण्यातील संघर्ष संपला
बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस) यांनी ‘एक्स’वरून आघाडीतील बिघाडी दर्शविणारे ट्वीट करीत ३१ मार्चला खळबळ उडवून दिली होती. सपकाळ यांच्या ‘ट्वीट’मध्ये “राज्यात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत तर बुलढाण्यात काय…?” असा मजकूर होता. त्यात दोन मल्ल झुंजत असल्याचे सूचक चित्रही होते. हे ट्विट करून सपकाळ यांनी आपला मोबाईल बंद करून ठेवला होता. यावर कळस म्हणजे त्याच दिवशी (रविवारी) आयोजित आघाडीचा मेळावा अर्धा संपत आला तरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे व अन्य पदाधिकारी मेळाव्याकडे फिरकलेच नव्हते. यामुळे मेळावा सोडून खेडेकर हे आमदार नितीन देशमुख यांच्या समवेत काँग्रेस कार्यालयात आले. त्यांनी काँग्रेस नेत्यांना मेळाव्यात येण्याची विनवणी केली होती. यामुळे आघाडीतील प्रामुख्याने या दोन पक्षांतील बिघाडी समोर आली होती.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गट व काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशांती या दोघा नेत्यांत दिलजमाई झाली. काल बुलढाण्यात पार पडलेल्या काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत याचे प्रत्यंतर दिसून आले. या बैठकीत खेडेकर व जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनीही हजेरी लावली. हा मेळावा संपल्यावर सपकाळ, खेडेकर व बुधवत यांच्यात खेळीमेळीच्या वातावरणात संवाद झाल्याचे दिसून आले.