धुळ्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरी

शासकीय निवासस्थानातील घटना

Loksatta news, Marathi, Marathi news
अनिकेतच्या नातेवाईकानी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते.

धुळे येथील तालुका पोलीस ठाण्यातील अधिकार्‍याच्या शासकीय निवासस्थानी नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच चोरट्याने घरफोडी करुन २१ हजार २०० रुपयांची रोकड व कपडे लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी रामराव पाटील हे लेनीन चौक येथील शासकीय निवासस्थानात (क्र. १८) वास्तव्यास आहेत. २७ मार्च रोजी सायंकाळी ते कर्तव्यावर होते. घरी परतल्यावर त्यांना घराचे कुलूप तोडलेले आढळून आले. त्यांनी घरात प्रवेश केला असता सर्व साहित्य, कपडे अस्ताव्यस्त पडलेले आढळले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तपासणी केली असता त्यांचे कपडे, डॉक्टरांच्या उपचाराच्या सहा फाईल्स व २१ हजार २०० रुपयांची रोकड असा ऐवज लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पोलीस निरीक्षक संभाजी रामराव पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांची चोरी केली. याबाबत निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पोलिसांनी मुन्ना उर्फ इरफान हसन अन्सारी याला संशयावरुन ताब्यात घेतले आहे. शासकीय निवासस्थानी चोरट्यांनी डल्ला मारुन रोकड व ऐवज लंपास केल्याने पोलीस दलात खळबळ माजली. अशाप्रकारे चोरी करुन चोरट्यांनी पोलिसांनाच एकप्रकारे आव्हान दिले आहे.

याआधीही अधिकार्‍यांकडे घरफोडीचे प्रकार
यापूर्वी धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पोलीस निरीक्षक मंगलसिंग सुर्यवंशी यांच्या शासकीय निवासस्थानी चोरी झाली होती. त्यावेळी चोरट्यांनी ऐवज व त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर, जिवंत काडतूस चोरुन नेले होते. अवघ्या काही तासातच ही चोरी उघडकीस आली होती. त्यावेळी चोरट्याने त्यांची ’सर्व्हिस रिव्हॉल्वर’ बारा पत्थर चौकाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ जमिनीत पुरुन ठेवली होती. पोलिसांनी सर्व्हिस रिव्हॉल्वर हस्तगत केली होती.

तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रमेश मुंडे याच्या घरातही चोरी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या घरातूनही जिवंत काडतूस, रोकड लंपास केली होती. ही चोरीही उघडकीस आली होती. आता पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्याकडे झालेल्या घरफोडीनंतर शासकीय निवासस्थानात होणाऱ्या चोऱ्यामुळे पोलिसांची घरेच किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Theft at police officers home in dhule

ताज्या बातम्या