पालघर : पालघर जिल्हा मुख्यालयाचे बांधकाम करणारे मुख्य ठेकेदार हर्ष कन्स्ट्रक्शनचे संचालक राहुल सूर्यवंशी यांच्या चारचाकी वाहनातून २ लाख ६५  हजार रुपयाची रोख रक्कम चोरीला गेली .

सूर्यवंशी हे पालघर कोळगाव येथे सुरू असलेले काम पाहण्यासाठी आपली गाडी उभी करून पुढे गेले असताना ही चोरी झाल्याची शक्यता आहे. वाहनांची काच फुटलेली दिसली. गाडीत आत पाहिले तर सूर्यवंशी यांची पैशाने भरलेली बॅग अज्ञातांनी लंपास केली होती. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.