डॉक्टर दाम्पत्याच्या खूनप्रकरणी तिघांना अटक

इस्लामपूरच्या डॉक्टर दाम्पत्याच्या खूनप्रकरणी रुग्णालयातील परिचारिकेसह तिघांना पोलिसांनी अटक केली

इस्लामपूरच्या डॉक्टर दाम्पत्याच्या खूनप्रकरणी रुग्णालयातील परिचारिकेसह तिघांना पोलिसांनी अटक केली असून खुनामागील कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. हे दुहेरी हत्याकांड नाजूक प्रकरणातून झाले, की आíथक कारणातून झाले हे अद्याप अस्पष्ट असून अटक करण्यात आलेल्या तिघांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाने रविवारी मंजूर केला.
इस्लामपूरच्या धरित्री हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रकाश वामन कुलकर्णी व त्यांच्या पत्नी डॉ. अरुणा कुलकर्णी यांची १९ डिसेंबरच्या मध्यरात्री हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्येप्रकरणी रुग्णालयात काम करणारी परिचारिका सीमा यादव हिच्यासह अर्जुन पवार आणि नीलेश दिवाणजी या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तिघांनाही पुढील तपासकामासाठी २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Three arrested for murder of a doctor couple