बिजापूर तालुक्यातील घटनाो महाराष्ट्र – छत्तीसगड पोलिसांची कारवाई
छत्तीसगड व महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने सीमावर्ती भागात संयुक्तपणे नक्षलवादविरोधी अभियान राबविण्यात येत असतांना बिजापूर तालुक्यातील छोटा कचलेर या गावालगतच्या नाल्यात लपून बसलेल्या नक्षलवादी व पोलीस यांच्यात शनिवारी सायंकाळी चकमक उडाली. यात सांड्रा दलम कमांडरसह तीन जहाल नक्षलवादी ठार झाल्याने या चळवळीला जबर धक्का बसला आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांचे मृतदेह अहेरी येथे हेलिकॅाफ्टरने आणले जाणार असल्याची माहिती गडचिरोलीचे उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर घातपात होऊ नये म्हणून महाराष्ट्र व छत्तीसगड पोलिसांनी सीमावर्ती भागात संयुक्तपणे नक्षलवादविरोधी अभियान सुरू केले आहे. ६ ते १० फेब्रुवारी या कालावधीत ही मोहीम राबविली जात आहे. गडचिरोली पोलीस दलाचे दोन सी-६० पथके, छत्तीसगड पोलीस दल व दामरंचा पोलीस ठाण्याचे एक पथक, अशा चार संयुक्त पथकाच्या माध्यमातून ही संयुक्त मोहीम सुरू आहे. ही मोहीम सुरू असतांनाच  बिजापूर तालुक्यातील कचलेर गावाजवळ नक्षलवादी आणि पोलिसांच्यात चकमक उडाली. छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात संयुक्त कारवाईला मिळालेले हे मोठे यश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three naxlite killed
First published on: 09-02-2014 at 01:37 IST