शनिवारी पहाटे साडे तीन वाजता चिखली-मेहकर मार्गावर चिखलीजवळच कोलारा फाटय़ानजीक स्कार्पिओ जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाले. मृतांपैकी तिघे सरपंच असल्याचे समजते.
या अपघातात ठार झालेल्यांमध्ये अमरावती जिल्ह्य़ातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रवीण देविदास गुल्हाने (रा. धामणगाव-दुधा), मंगेश वामन म्हात्रे, नरेंद्र वसंतराव बहुरूपी (रा.बाभूळगाव वाठोरा), अरविंद शंकर टाले (रा.गुंजी) यांचा समावेश आहे. धामणगाव रेल्वे परिसरातील सरपंच व पदाधिकारी स्कार्पिओ या वाहनातून जळगाव येथे अधिवेशनासाठी जात होते. मेहकर-चिखली रस्त्यावर कोलारा फाटय़ानजीक चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला लिंबाच्या झाडावर जोरात आदळली. अपघातग्रस्त वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला होता. अथक प्रयत्न करून मृत व जखमींना वाहनाबाहेर काढावे लागले. या वाहनात एकूण आठ प्रवासी होते.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2014 रोजी प्रकाशित
तीन सरपंचांसह चौघांचा अपघाती मृत्यू
शनिवारी पहाटे साडे तीन वाजता चिखली-मेहकर मार्गावर चिखलीजवळच कोलारा फाटय़ानजीक स्कार्पिओ जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाले.
First published on: 16-02-2014 at 02:28 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three village heads killed in accident