टोलविरोधी आंदोलन व्यवस्थित न हाताळल्याचा ठपका ठेवत कोल्हापूरचे पोलीस उप-अधीक्षक बी. टी. पवार आणि शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. स्वतः पवार यांनीच आपल्याला पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून निलंबनाची नोटीस मिळाल्याचे एका वृत्तवाहिनीला सांगितले.
कोल्हापूरात १२ जानेवारी रोजी टोलविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागून संतप्त नागरिकांनी फुलेवाडी व शिरोली टोल नाके पेटवून उद्ध्वस्त करीत आपल्या उद्रेकाचे दर्शन घडविले. टोल रद्द केल्याची घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्यानंतरही १२ जानेवारीला टोलवसुली सुरूच राहिल्याने संतप्त जमावाने टोल नाके पेटवून दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूरात टोलविरोधी आंदोलन सुरू होते. या स्थितीत आंदोलनाचा भडका उडाला असताना ते व्यवस्थितपणे न हाताळता स्वस्थ बसून राहिल्याचा ठपका ठेवत या दोन्ही अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2014 रोजी प्रकाशित
कोल्हापूरचे दोन पोलीस अधिकारी निलंबित; टोलविरोधी आंदोलनाचा फटका
कोल्हापूरात १२ जानेवारी रोजी टोलविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागून संतप्त नागरिकांनी फुलेवाडी व शिरोली टोल नाके पेटवून उद्ध्वस्त करीत आपल्या उद्रेकाचे दर्शन घडविले.
First published on: 23-01-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toll agitation two police officers suspended in kolhapur