सांगली :  दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या मांडूळ जातीच्या सर्पाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात दोघा युवकांना तासगाव तालुक्यातील धुळगाव येथे अटक करण्यात आली. सांगली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि वन विभागाच्या संयुक्त कारवाईमध्ये मांडूळ जातीच्या सर्पाची तस्करी उघडकीस आणण्यात यश आले. या प्रकरणी तनवीर रहमान कामिरकर आणि फिरोज सलीम मुजावर (वय २४,  दोघेही रा. धुळगाव) या दोघांना वन विभागाने अटक केली आहे.

गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना याबाबत माहिती मिळाली होती. सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने वन विभागाचे अधिकारी कौशला भोसले यांच्या समवेत मुजावर याच्या शेतात असलेल्या शेडवर छापा मारला.

या वेळी बॅरेलमध्ये दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या मांडूळ जातीचा सर्प मिळून आला. वन विभागाने हा सर्प ताब्यात घेऊन त्याला नैसर्र्गकि अधिवासात मुक्त केले.