scorecardresearch

अकोला : मन नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील मन नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.

dead

अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील मन नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. ७ वर्षीय मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम आणि ९ वर्षीय दानियाल मोहम्मद फैय्याज असे या दोन्ही मृत मुलांची नावे आहेत.

हेही वाचा >>>बुलढाणा: दुसऱ्या टप्प्यात वाढली ‘पदवीधर’च्या मतदानाची गती; आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी पहिल्याच टप्पात केले मतदान

बाळापूर शहरातून ‘मन’ नदी वाहते. या नदीच्या काठावर अनेक घरे असून परिसरातील लहान मुले नदीकाठावर खेळत असतात. दोन्ही मुले मन नदीकाठी रविवारी सायंकाळी खेळायला गेली होती. खेळत असतांना त्यांचा तोल गेला आणि ते नदीत पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नदीकाठी धाव घेतली. नदीत शोध कार्य राबवले. रात्री उशीरा मुलांचा शोध लागला. त्यांना नदी बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. मात्र, तपासणी करून त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर बाळापूर शहरात खळबळ उडाली.

नदीकाठी सुरक्षा भिंत नसल्याने परिसरातील नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 14:15 IST
ताज्या बातम्या