दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती, फडणवीस यांचा गौप्यस्फोट

त्यावेळी चर्चेचे काही टप्पे पुढे गेल्याचंही केलं स्पष्ट

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यासंदर्भात काही चर्चाही झाल्या होत्या. मात्र भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यावेळी सांगितलं की शिवसेना सोडून हे आपल्याला करता येणार नाही. जर शिवसेना सोबत राहून जर राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं असेल तर घेऊ असंही तेव्हा ठरलं होतं. चर्चा बऱ्याच पुढे गेल्या होत्या मात्र नंतर ते सगळं प्रकरण थंड बस्त्यात गेलं असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती. पण भाजपा नेतृत्वाने शिवसेनेला सोडायला नको अशी आम्ही भूमिका घेतल्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही दोन वर्षापुर्वी राष्ट्रवादी सोबत गेलो असतो असं वक्तव्य केलं आहे. ही मुलाखत समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या सोबत यायची इच्छा होती. त्यासाठी चर्चा ही झाल्या होत्या, मात्र आम्हाला वरिष्ठांनी शिवसेनेसोबत राहण्यास सांगितले”

तसेच ते पुढे म्हणाले की, “हे सरकार पाडण्याचा आमचा अजेंडा नाही. पण या सरकारचं काय आणि कसं चालल आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे मला नाही वाटत, हे सरकार जास्त काळ टिकेल”, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यातील करोना बाधित रुग्णाची परिस्थिती लक्षात घेता, राज्याच्या प्रमुखांनी समन्वय साधला पाहिजे. मात्र हे होताना दिसत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Two years ago the ncp wanted to come with us says devendra fadanvis scj 81 svk

ताज्या बातम्या