ताडीचं अतिसेवन केल्याने दोन तरुणांचा मृत्य झाल्याची घटना डोंबिवली कोपर परिसरात घडली आहे. सचिन पाडमुख व स्वप्नील चोळके अशी या मृत तरुणांची नावं आहेत. स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता. मात्र दोन महिन्यांपासून प्रकृती नीट नसल्याने सुट्टीवर होता. विष्णू नगर पोलिसांनी याप्रकरणी ताडी विक्रेता रवी भटनीविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

डोंबिवली पश्चिम कोपर परिसरात राहणारे सचिन पाडमुख व स्वप्नील चोळके हे दोघे काल सायंकाळी आपल्या मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरवर ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन पडमुख व स्वप्नील चोळके घरी परतत असताना रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांच्या मित्रांनी दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती मिळताच विष्णुनगर पोलिसांनी ताडी विक्रेता रवी भटने विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. दोघांचा मृत्यू ताडीच्याअतिसेवन केल्याने झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालेराव यांनी सांगितले. सचिनच्या कुटुंबीयांनी ताडी विक्रेत्यावर कठोर कारवाई करत न्याय देण्याची मागणी केली आहे.