अंगारिका संकष्टीनिमित्त जालना जिल्ह्यातील राजूर येथील गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले आहेत. नीलेश हिरालाल चव्हाण (वय २०) व प्रशांत आरके (वय २१), अशी मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत.

हेही वाचा- ‘द काश्मीर फाइल्स’ची ऑस्कर २०२३ मध्ये एंट्री; अनुपम खेर पोस्ट शेअर करत म्हणाले….

मृत दोघेही भोकरदन येथील रहिवासी आहेत. दर्शन करून परतत असताना मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास भोकरदन-राजूर रस्त्यावरील टेपले पेट्रोल पंपाजवळ, हा अपघात घडला. अपघातात अनिकेत बाळू वाहुळे ( १८ ) व आरेफ सलीम कुरेशी (२२) हे दोघे जखमी झाले. या दोघांवर राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. हे चारही युवक दुचाकीवरून प्रवास करत होते आणि त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा करण्यात येत आहे.