विश्वास पवार
वाई : साताऱ्यात उमेदवारी अर्ज दाखल करायला करण्यास सुरुवात झाली असली तरी खासदार उदयनराजे भोसले अद्यापही उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची उमेदवारी महायुतीतून भाजपने अद्यापही जाहीर केलेली नाही. सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असलेले उदयनराजे भोसले दिल्लीत ठाण मांडून मुंबई फिरून आले. भाजपकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या मुद्दय़ावरून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, भाजपने या नाराजीची कोणतीही दखल घेतलेली नाही.

उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून समाधान न झाल्याने त्यांनी दिल्लीत धाव घेतली.  दिल्लीतील अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही उमेदवारी लांबणीवर पडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी भाजपमधून विरोध असल्याची चर्चा आहे.

Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ
Sharad Pawar On Eknath Khadse join Bjp
एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “नाईलाजाने…”

हेही वाचा >>>उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना सातारा आणि माढा मतदारसंघांवर दावा केला होता. मात्र, माढा मतदारसंघाची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अगोदर जाहीर करण्यात आली. साताऱ्याची जागा अजित पवार गटाने हक्काने मागून घेतली आहे. त्यांचा उमेदवार तयार असतानाही उदयनराजे यांनी शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली. अजित पवार गटा कडून उदयनराजेंना घडय़ाळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे सांगण्यात आले. धनंजय मुंडे यांनी तसा निरोप दिला. मात्र, उदयनराजे भाजपच्या कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

अजित पवार जागा सोडायला तयार नाहीत आणि उदयनराजे ठाम असल्यामुळे भाजपची अडचण झाली आहे. उदयनराजे यांची राज्यसभेची मुदत अजून शिल्लक आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांना राज्यसभेतूनच पक्ष संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत  विचार करता येईल परंतु आपण साताऱ्याच्या जागेचा हट्ट सोडावा असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पक्षश्रेष्ठींचा निरोप घेऊन भाजपने गिरीश महाजन साताऱ्यात येऊन उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंना भेटून गेले. भाजप पक्षश्रेष्ठींच्या निरोपानंतरही उदयनराजे कमळ या चिन्हावर निवडणूक मिळविण्यासाठी अडून राहिल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नाराज आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागत आहे. उदयनराजेंना उमेदवारी भाजपाकडून मिळाली तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट शशिकांत शिंदेंना मदत करतील अशी भीती भाजपाला आहे. राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळे झाले असतील तरी कार्यकर्ते मात्र एकत्रच आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भाजप कोणाची नाराजी आणि जोखीम ओढून घ्यायला तयार नाही. त्यामुळे उदयनराजेंच्या उमेदवारीची प्रतीक्षा कायम आहे.