वाई : उदयनराजेंनी सातारा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या प्रतिक्षेवरून रोखठोक भूमिका मांडत,मी संन्यास घेणार नाही, जेव्हा ठरेल त्यावेळी बघू असे सांगत भाजपाला घरचा आहेर दिला आहे. माझ्याकडे रेल्वे,बस, पिक्चर आणि विमानाचं आदी सगळी तिकीट असल्याची मिश्किली केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची प्रतीक्षा वाढत असल्याने खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते साताऱ्यात आक्रमक झाले झाले होते.

त्यानंतर उदयनराजेंनी आक्रमक होत, मी संन्यास घेणार नाही, जेव्हा ठरेल त्यावेळी बघू असे सांगत सूचक इशारा दिला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस कडून धनंजय मुंडे यांनी निवडणूक लढविण्याची खुली ऑफर दिली असल्याची माहिती मिळत आहे. साताऱ्यातून त्यांना भाजपाची उमेदवारी न मिळाल्यास ते इतर पक्षाकडून लढणार काय याबाबत चर्चा सुरु आहे. अशातच पत्रकारांनी उदयनराजेंना तिकिटावरून प्रश्न विचारला आणि त्यांनीही ‘तिकीट’ या शब्दाला धरुन कोटी करत मिश्किली केली. महायुतीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही.तिकीटवाटपाचा घोळ सुरु आहे, त्याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांना पत्रकारांनी विचारला. जेव्हा मिळेल तेव्हा बघू, असं म्हणाले.

Ganesh Naik, Thane, eknath shinde,
गणेश नाईक यांची ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांना भेटलो, हस्तांदोलन झाले आणि…
Kolhapur, Modi, Congress,
कोल्हापूर : पराभवाच्या भीतीने मोदींचे काँग्रेसवर बेछूट आरोप; रमेश चेनिथला
Udayanraje Bhosale
“साताऱ्यासाठी एकही चारित्र्यसंपन्न उमेदवार मिळाला नाही”, उदयनराजे भोसलेंची शरद पवार गटावर टीका
Udayanraj Bhosle is upset because the BJP has not yet announced his candidature
उदयनराजेंना उमेदवारीची प्रतीक्षाच; भाजपकडून अद्याप उमेदवारी जाहीर केली नसल्याने नाराजी 

आणखी वाचा- छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार कोण असणार? संजय शिरसाट यांनी सांगितली ‘ही’ चार नावं

साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे त्यावर भाजपाने हक्क सांगितला आहे त्यामुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे. त्यामुळे भाजपचा साताऱ्याच्या जागेवरुन अद्याप तिढा कायम आहे. त्यामुळे त्यांचा पुढचा निर्णय काय असेल, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. आताच बोलणं योग्य होणार नाही,उमेदवारीची फारच प्राथमिक स्टेज आहे. तीन पक्षांचं एकत्र महायुतीचं सरकार आहे . जागा वाटपात पुढे मागे होतंच. त्यांच्या त्यांच्या पक्षाचं. अजित पवार,एकनाथ शिंदे असतील. भाजपच तिकीट मिळालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं. त्यात काही चुकीचं नाही.

भाजपा कडून उमेदवारी न मिळाल्यास उदयनराजे अपक्ष लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून घडविण्याबाबत काय निर्णय होऊ शकतो हे लवकरच स्पष्ट होईल. धनंजय मुंडे यांनी संपर्क केला असल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी आज साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतल्याने पुन्हा उलट सुलट चर्चांना पुन्हा उधान आले आहे . दुपारी उदयनराजेंनी मला कुठे जायचे आहे ते माहित आहे आणि लोकांच्या माध्यमातून जायचं असल्याची समाज माध्यमावर पोस्ट करून आपण निवडणुकीच्या रिंगणात कायम असल्याचे संकेत दिले आहेत .