माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आज धाराशिव आणि भूम या ठिकाणी झालेल्या सभेत त्यांनी भाजपावर आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. तसंच एक भावनिक वक्तव्यही केलं जे चांगलंच चर्चेत आहे. आज त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच हे म्हटलं आहे लोकसभेची लढाई लांडगे विरुद्ध वाघ अशी आहे.

राहुल नार्वेकरांवर आरोप

राहुल नार्वेकरांवर मी आरोपच करतोय, लोकसभेची उमेदवारी देऊ हे लालूच दाखवून भाजपाने माझ्या शिवसेनेविरोधात तुम्हाला निर्णय द्यायला लागला. कारण सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटलं आहे की लवादाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधातला वाटत नाही का? हे इतकं म्हणूनही यांची वृत्ती निर्लज्जं सदा सुखी अशी आहे. भाजपा काय, मिंधे काय आणि ७० हजार कोटींचा घोटाळा करणारे काय हे असेच. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Eknath shinde and sharad pawar
“मग शरद पवारांवर ही वेळ का आली?” ‘शपथनामा’वरून एकनाथ शिंदेंची बोचरी टीका, म्हणाले…
nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

तेजस, आदित्य ज्यांना काका म्हणायचे ती माणसं..

उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या जेव्हा लक्षात आलं की अरे ही सगळी माणसं तर आपली होती. शिवसेनाप्रमुखांनी यांना हवं ते दिलं. मी यांच्यातल्या अनेकांना माझ्या लहानपणापासून पाहात आलो. काही जणांना त्यांच्या लहानपणापासून पाहात आलो. घरातल्या कुटुंबीयांप्रमाणेच आम्ही त्यांच्याशी वागलो. तेजस, आदित्य त्यांनाही काका-काका म्हणायचे तो माणूस इतका उलटा फिरतो? असा भावनिक प्रश्न त्यांनी विचारला. एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप, “भाजपाने लालुच दाखवलं म्हणूनच…”

मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं..

आज तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. परिस्थिती अशी निर्माण झाली की भाजपाने आपल्याला दगा दिला. पाठीत वार केला. मी तुळजाभवानीची शपथ घेऊन आजही तु्म्हाला सांगतो अमित शाह आणि मी बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत होतो तिथे त्यांनी मला मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेऊ असा शब्द दिला होता. मात्र नंतर त्यांनी आपल्याला दगा दिला. त्यांनी शब्द पाळला असता तर ही सगळी वेळ आलीच नसती. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.