शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी झालेल्या भाषणात नरेंद्र मोदी, भाजपा, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस सगळ्यांचा समाचार झाला. निवडणूक पाच नाही दहा टप्प्यात घेतली असती तर मी रोज यांची सालटी काढली असती असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचप्रमाणे ते म्हणाले तुम्ही प्रेमाने वागलात तर आम्ही प्रेमाने वागू. पण जर पाठीत वार केलात तर वाघनखं काढू.

सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका

“सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूरमध्ये जनतेने नखं उपटली आहेत ते आता लंडनला वाघनखं आणायला चाललेत. कशाला तुम्ही छत्रपतींचा अपमान करत आहात? एक तर तुमची पात्रता नाही, तुम्ही गद्दार मानसिकतेचे आहात. भगव्याशी बेईमानी करणारी तुमची अवलाद आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात छत्रपतींचा भगवा होता, त्यावर कुठलंही चिन्ह नव्हतं. पण भगव्यात तु्म्ही भेद केला. आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपल्या भगव्यावर कुठलंही चिन्ह टाकायचं नाही. मशालीचा प्रचार वेगळा करा. धगधगती मशाल तर आपली आहेच. पण छत्रपतींच्या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न जो त्यांनी केला आहे तो आपण करायचा नाही. ज्यांनी कलंक लावला त्यांना गाडायचं आहे. आपल्या शिवसेनेचा भगवा हा भगवाच असला पाहिजे त्यावर चिन्ह नको. छत्रपतींचा भगवा हीच आपली ओळख. “असं उद्धव ठाकरे म्हणाले.

case registered against 22 including sharad pawar group mla jitendra awad at mumbra police station
आमदार जितेंद्र आव्हाडांसह २२ जणांवर गुन्हे दाखल; खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा तक्रारदारीत आरोप
pooja khedkar ias father dilip news
“…तर मी उद्याच मुलीला राजीनामा द्यायला सांगतो”, IAS पूजा खेडकर यांच्या वडिलांचं थेट आव्हान; म्हणाले, “हे सगळं…”
Mukesh Ambani Strict Diet Plan
मुकेश अंबानी यांचा डाएट प्लॅन नीता अंबानींनी केला शेअर; पार्टी, मेजवान्यांमध्येही कठोरपणे पाळतात ‘हा’ नियम
Jitendra Awhad Answer to Chhagan Bhujbal
जितेंद्र आव्हाड यांचं छगन भुजबळांना उत्तर, “शरद पवारांचं नाव घेत नाही तोपर्यंत…”
authenticity of shivaji maharaj waghnakh
लंडनमधील वाघनखे छत्रपती शिवरायांचीच; मुनगंटीवार यांची ग्वाही
monoj jarange replied to chandrakant patil
“तुम्हाला नातेवाईक आणि सगेसोयरे यांच्यातील फरक कळतो का?” मनोज जरांगेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर!
Criticism of Eknath Shinde government regarding Rabindra Waikar investigation closed by the ed print politics news
खासदार वायकर यांना अभय; विरोधकांची टीका; सोमय्या कुठे गेले, काँग्रेसचा सवाल
Neelam Gorhe Ambadas Danve
दिलगिरीनंतर उपसभापती नीलम गोऱ्हे अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेणार? म्हणाले, “सभागृहाचं पावित्र्य राखण्यासाठी…”

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “भाजपा आणि मिंध्यांना माझं आव्हान आहे, षंढ नसाल तर…”

मशालीनेच आपण यांच्या बुडाला आग लावली

“मशाल आणि भगवा यांच्यात साधर्म्य आहे. ती मशाल घेऊन आपण यांच्या बुडाला आग लावली आहे. भुपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे मंत्री म्हणून नालायक ठरले आहेत, त्यांना आता महाराष्ट्राचे प्रभारी नेमण्यात आलं आहे. महाराष्ट्रात ते खालसा होणार आहेत. देशाच्या मंत्र्यांना पक्षाचं काम देणार असाल तर देशाचं काम करणार कोण? असं घडलं तर अपघात होणारच.” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पुन्हा येईन म्हणारे आता गाणं म्हणत आहेत वाजवले ना बारा

पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणत आहेत जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा. आता वाजवले की बारा तुमचे. बारा वाजवले आहेत तरीही सत्यानास करायचा आहे. कुणाची महाराष्ट्राशी नाळ जोडलेली नाही असं हे सरकार चाललं आहे. आता लढाई लढायची आहे आता आपल्याला थांबता येणार नाही. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमचीच रेकॉर्ड तुम्ही ऐका

जनतेच्या न्यायालयात आम्ही आमची लढाई जिंकलो आहोत. मात्र आता आम्हाला हेच वाटतं आहे की हे सरकार पडलंच पाहिजे. आपल्यावर आरोप करायचे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही नैसर्गिक युती नाही. म्हणजे काय ? हे सांगाल का देवेंद्र फडणवीस? तुम्ही जे त्रांगडं करुन ठेवलंय आणि मला नागपूरच्या अधिवेशनात म्हणाला होतात काट्याच्या अळीवर वसली तीन गावे एकही वसेचि ना. आता ते काढून ऐका तुमचं तुम्ही. असाही टोला देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.