‘जी-२०’ शिखर परिषदेची बैठक ९ आणि १० सप्टेंबरला दिल्लीत पार पडली. या बैठकीला ४० हून अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख हजर होते. शनिवारी ( ९ सप्टेंबर ) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावतीने डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. या डिनरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

“ऋषी सुनक यांच्याबरोबर फोटो काढला. काय बोलले त्यांना? कोणत्या भाषेत बोलले?” अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची उडवली आहे. ते जळगावमध्ये सभेत बोलत होते.

हेही वाचा : “२५ वर्षात शिवसेनेची भाजपा झाली नाही, मग…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

उद्धव ठाकरे म्हणाले, “मणिपूरमध्ये काय चाललं आहे, याच्या बातम्याही येत नाही. महिलांची खुलेआम विटंबना झाली. देशाचे पंतप्रधान ‘जी-२०’ मध्ये लगबग करत आहेत. मुख्यमंत्रीही दिल्लीला गेले आहे. एकतर बेकायदा मुख्यमंत्रीआहेत. ‘जी-२०’ परिषदेत जाऊन बायडेनशी बोलणार का?”

“ऋषी सुनक यांच्याबरोबर फोटो काढला. पण, काय बोलले त्यांना? कोणत्या भाषेत बोलले तेही सांगा… सुनक तुम्हाला काय बोलले कळलं का? चमकोगिरी करण्यासाठी नुसता फोटो आला पाहिजे,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंच्या जळगावातील सभेनं चार टकल्यांच्या मनात धडकी भरलीय”, संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना स्टेज थोडा हालत होतं. त्या स्टेजसारखंच केंद्र सरकार डगमगत आहे. पडतंय कधी कळत नाही. एवढे घाबरले आहेत की, आधी वाटायचं समोर कुणी आव्हान नाही. मात्र, सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र झाले आहेत. ‘इंडिया’ नावाची यांना खाज सुटली आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.