राज्याच्या विधानसभा निवडणुकींचा प्रचार राजकीय पक्षांकडून धुमधडाक्यात सुरू आहे. आरोपप्रत्यारोपाने राजकीय शिमगा रंगात आला आहे. ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने ही निवडणूक संपादकांच्या नजरेतून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात होत असलेल्या या निवडणुकीकडे संपादक कसं बघतात? राजकीय पक्षांच्या भूमिकेविषयीचं त्यांचं मत? यासंदर्भात ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर यांच्याशी संवाद साधला.

राजीव खांडेकर यांच्या मुलाखतीचा पहिला भाग येथे पाहा –

यावेळी बोलताना खांडेकर म्हणाले, “शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं हे विधान शिवसैनिकांसाठी आहे, ते इतरांनी गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” असं मत नोंदवलं. याचबरोबर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं.