महाराष्ट्रात गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू करण्याच्या मुद्द्यावरून वारकरी संघटना आक्रमक पवित्रा धारण करण्याच्या तयारीत आहेत. येत्या आषाढी एकादशीपूर्वी राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा मंजूर न केला गेल्यास, आंदोलन छेडण्याचा इशारा वारकरी संघटनेचे नेते बंडातात्या कराडकर यांनी दिला. या मागणीचा योग्य तो विचार न झाल्यास, मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलपूजा करू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. पंढपूरच्या वाटेवर असणाऱ्या वारीलाच आंदोलनाचे रूप देण्याचा निर्धार वारकऱ्यांनी केल्याची माहिती बंडातात्या कराडकरांनी दिली.