जिल्हा परिषदेमार्फत हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व जिल्हा परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित वसंत अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनात प्राप्त झालेल्या निधीत कमालीच्या अनियमितता आणि अपहार झाल्याचा आरोप सत्तारूढ राष्ट्रवादी कांॅग्रेसवर विरोधी पक्षनेते कांॅग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्यासह सर्व कांॅग्रेस सदस्यांनी राष्ट्रवादीला चांगलेच अडचणीत आणले आहे.
जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत कांॅग्रेसने राष्ट्रवादीवर केलेल्या या आरोपांना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी वार्ताहर परिषद घेऊन फेटाळून लावले.मंगळवारी वार्ताहर परिषदेत त्यांनी स्पष्ट केले की, कृषी प्रदर्शनात पशाचा अपहार किंवा अनियमितता झालेली नाही. विविध मार्गाने आम्ही ५१.५० लाख रुपये जमा करून धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने समिती गठित करून प प चा हिशेब ठेवला आहे. शासनाने दिलेल्या दीड कोटी रुपयांचेही अंकेक्षण केले आहे. काही अपरिहार्य कारणाने प्रदर्शनी पुढे ढकलण्यात आल्याने नियोजित खर्चापेक्षा प्रत्यक्षात खर्च जास्त झाला. या सर्व बाबी माहिती असूनही विरोधक मात्र सातत्याने केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कांॅग्रेसने भाजप, सेना आणि अपक्ष यांच्याशी युती करून सत्ता मिळवली असून कांॅग्रेसला पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रथमच सत्तेबाहेर ठेवले आहे. त्यामुळे कांॅग्रेस आणि राष्ट्रवादीतून विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे. परस्परांवरील आरोप-प्रत्यरोपांच्या फैरी रोज झडत आहेत. विशेष सभेला सभापती सुभाष ठोकळ, शिक्षण व आरोग्य सभापती मनमोहनसिंग चव्हाण, समाजकल्याण सभापती प्रभाकर उईके, महिला व बालकल्याण सभापती प्राजक्ता मानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. वसंत अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनावर मंजूर खर्चापेक्षा अतिरिक्त खर्च करून शेतकऱ्यांसाठी आलेल्या निधीच्या पैशात अपहार करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप कांॅग्रेसने केला. कृषी प्रदर्शनाच्या झालेल्या खर्चाची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी सभागृहाला द्यावी, अशी मागणी कांॅग्रेस गटनेते देवानंद पवार यांनी केली. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने काही काळ सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. कृषी प्रदर्शनाच्या नावावर आíथक मलिदा लाटण्यात आल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला असला तरी जिल्हा परिषदेत प्रदर्शनाच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. हे प्रकरण आपण न्यायालयात नेणार असल्याचे पवार यांनी लोकसत्ताला सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2014 रोजी प्रकाशित
वसंत अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनातील खर्चावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत शीतयुध्द
जिल्हा परिषदेमार्फत हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व जिल्हा परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित वसंत अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनात
First published on: 20-02-2014 at 02:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant agro tech exhibition conflict in congress ncp