शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा न्यायालयीन लढा ११ तारखेपासून सुरु होणार असला तरी राज्यामध्ये शिंदे गट आणि भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यानंतरही दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप आणि शाब्दिक देवाणघेवाण सुरुच आहे. त्यातच आता बुलढाण्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांबद्दल केलेल्या एका विधानावरुन गायकवाड यांनी त्यांची खिल्ली उडवलीय.

नक्की पाहा >> Video: मुसळधार पाऊस, डोक्यावर गुलाल अन् ढोल… ढोलवादन करत मिसेस मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंचं स्वगृही स्वागत

बुलढाणा येथे परतल्यावर गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी संजय राऊत यांच्यासहीत शिवसेनेच्या कारभारावरुन नाराजी व्यक्त करत रोखठोक शब्दांमध्ये टीका केली. दरम्यान एका पत्रकाराने आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना डोळ्यात डोळे घालून चर्चा करण्यासंदर्भातील आव्हान दिल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला. “कधीतरी त्यांना (बंडखोर आमदारांना) समोर यावं लागणार आहे. त्यांना कधीतरी आमच्या डोळ्यात डोळे घालून पहावं लागणार आहे. जेव्हा ते आमच्यासमोर असतील तेव्हा डोळ्यात डोळे घालून काय चूक केली हे त्यांना सांगावं लागेल ती त्यांची विश्वासदर्शक ठरावानंतरची दुसरी परीक्षा असेल,” असं आदित्य म्हणाले होते.

नक्की पाहा >> Video: विधानसभेच्या दारात शिवसेनेच्या बंडखोर आमदाराला पाहताच आदित्य ठाकरे त्याला म्हणाले, “एवढे जवळचे असून…”

याचसंदर्भात पत्रकाराने प्रश्न विचारला असता गायकवाड यांनी आदित्य यांचे डोळेच दिसत नाही अशा अर्थाची प्रतिक्रिया दिली. “त्यांचे डोळे दिसतील तर मिळवतील. काय सांगू तुम्हाला…” असं म्हणत गायकवाड शेजारी बसलेल्या सहकाऱ्याच्या खांद्यावर हात ठेऊन हसू लागले. त्यानंतर त्यांनी, “आम्ही इतक्या वेळा समोरासमोर जायचो त्यांनी कधी नमस्कार नाही केला. हे दु:ख आहे सगळ्या आमदारांचं,” असंही गायकवाड म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> CM टू सेम…!!! एकनाथ शिंदेंसारखाच दिसतो ‘हा’ उद्योगपती; स्वत: फोटो शेअर करत म्हणाला, ‘सॉरी’ आणि ‘जय महाराष्ट्र’

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन १०० टक्के शिवसेना संपवायला निघाले होते, असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला. गायकवाड यांनी राऊत यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत त्यांच्यावर टीकेची तोफ डागली. ”संजय राऊत यांनी जर बाप काढला तर मलाही काढता येतो. ज्या ४२ जणांनी त्यांना मतदान केले  ते सर्व त्यांचे पण बाप आहेत. आधी खासदारकीचा राजीनामा द्या. मग आम्हाला सांगा,” असा टोला गायकवाड यांनी लगावला.

राष्ट्रपुरुष कुणाचा व्यक्तिगत नसतो, देशाचा असतो. आमच्या प्रत्येक फलकावर बाळासाहेबांचे छायाचित्र असणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. जे जनतेतून निवडून येत नाही, त्याच चार पाच लोकांना तिकडे महत्व आहे. तेच चार पाच लोक उद्धव ठाकरेंकडे आहेत, असे ही गायकवाड म्हणाले.