कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. याविरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांचा विरोधात पोलीस बळाचा वापर करून प्रशासनाने मोडून काढला. तरीदेखील स्थानिकांचा विरोध सुरूच आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतही या आंदोलनात स्थानिकांच्या बाजूने उभे राहिले आहेत. या रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या खासदार विनायक राऊत यांना आज अटक करण्यात आली. या अटकेची माहिती राऊत यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे.

बारसूमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्पास विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचे अमानुष अत्याचार सुरू असल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी ही दडपशाही थांबवून पोलीस फौजफाटा मागे घेण्याची मागणी बुधवारी केली होती. त्यानंतर ते या आंदोलनात सहभागी झाले. परिणामी आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

rajan vichare marathi news, rajan vichare cm eknath shinde marathi news
“दाढी वाढवली म्हणजे, कोणी दिघे साहेब होत नाही”, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांची टीका
unmesh patil girish mahajan
“मंत्रिमंडळाच्या बैठकीत गिरीश महाजन झोपा काढतात”, उन्मेष पाटील यांचा आरोप
Muralidhar Mohol, Ravindra Dhangekar
माझ्यासोबत पुणेकरांचे प्रेम – मुरलीधर मोहोळ; रवींद्र धंगेकर यांना टोला
Sunita Kejriwal
अरविंद केजरीवालांचा तुरुंगातून संदेश; पत्नी सुनीता म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी आप आमदारांना आपापल्या मतदारसंघात…”

बारसू परिसरात परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या असून प्रकल्प झाल्यास भूमिपुत्रांचा नव्हे, तर परप्रातीयांचा फायदा होणार असल्याचे राऊत यांनी काल सांगितले होते. प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा आज मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राऊत यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बारसू परिसरातील पाच गावांमध्ये जाऊन स्थानिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती राऊत यांनी काल दिली.

(बातमी अपडेट केली जात आहे.)