scorecardresearch

Premium

“निलेश राणेंनी निवृत्ती न घेता लोकसभेला उभे राहावं, मग…”, विनायक राऊतांचं थेट आव्हान

“नारायण राणेंनी निलेश राणेंना फटकारलं आहे, दुसरीकडे…”, असेही विनायक राऊत म्हणाले.

nilesh rane vinayak raut
विनायक राऊत यांनी निलेश राणे यांना आव्हान दिलं आहे. ( संग्रहित छायाचित्र )

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी २४ ऑक्टोबरला राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. यामुळे कोकणासह महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केल्यानंतर निलेश राणेंनी आपली निवृत्ती मागे घेतली. यातच आता खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणेंना लक्ष्य केलं आहे.

“निलेश राणेंनी राजकीय निवृत्ती घेऊ नये. पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरावं. मग, पराभव काय असतो, ते दाखवतो,” असं आव्हान विनायक राऊतांनी निलेश राणेंना दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Indications of Shrimant Shahu Maharaj Chhatrapati getting his candidature from Kolhapur Lok Sabha Constituency
‘ब्रेकिंग न्युज’ लवकरच; श्रीमंत शाहू महाराज यांचे उमेदवारी मिळण्याचे संकेत
shivajirao sawant literature marathi news, shivajirao sawant memorial hall kolhapur, shivajirao sawant memorial hall ajara village marathi news
कोल्हापूर : साहित्यप्रेमींना पर्वणी; शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे आजरा गावात थाटात लोकार्पण
Shri Govind Dev Giri Maharaj and Samarth Ramdas Swami
समर्थ रामदास स्वामी यांच्याशी श्री गोविंददेव गिरी महाराजांची तुलना; योगी आदित्यनाथ म्हणाले…
Shambhuraj desai on Ganpai Gaikwad Firing Case
“एकनाथ शिंदेंकडून कोट्यवधी रुपये येणे बाकी”, गणपत गायकवाडांच्या आरोपांवर शंभूराज देसाई म्हणाले, “दीड वर्षांत…”

हेही वाचा : उलटा चष्मा: औटघटकेचे नाट्य

विनायक राऊत म्हणाले, “राजकीय नाटक कसं करायचं, हे राणे कुटुंबाकडून शिकूव घ्यावं. एकीकडे नारायण राणेंनी निलेश राणेंना फटकारलं आहे. तर, दुसरीकडे नितेश राणेंनी निलेश राणेंना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोकण दौऱ्यात आले असताना निलेश राणेंना कुठं स्थान मिळालं, हे सर्व लोकांनी पाहिलं आहे.”

“फडणवीसांनी सांगितल्यामुळे निलेश राणेंनी वळवळ चालू केली आहे. पण, ही फार दिवस चालणार नाही. निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्ती घेऊ नये. पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरावं. पराभव काय असतो, ते दाखवतो,” असं आव्हान विनायक राऊतांनी निलेश राणेंना दिलं आहे.

हेही वाचा : राजकीय कोंडीतून सुटकेसाठी नीलेश राणेंचा राजसंन्यास?

निलेश राणे काय म्हणाले होते?

निलेश राणे यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर निवृत्तीची घोषणा केली होती. “नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपामध्ये खूप प्रेम भेटलं. भाजपासारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे,” असं निलेश राणे म्हणाले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vinayak raut challenge nilesh rane loksabha election 2024 ssa

First published on: 05-11-2023 at 14:28 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×