शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीउसाच्या मालमोटारींची तोडफोड सुरू केली असून पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच, मालमोटारींना पोलीस बंदोबस्त देण्यास सुरूवात केली आहे. श्रीरामपूर, राहाता, नेवासे, राहुरी, संगमनेर व अकोले तालुक्यात ऊसतोड सुरू आहे. नगर व नाशिक जिल्ह्यांमधील धरणातील पाणी जायकवाडीत सोडण्याची मागणी झाली आहे. त्यामुळे अद्याप शेतीकरिता आवर्तन सोडण्याचा निर्णय झालेला नाही. उसाच्या उभ्या पिकाला पाण्याची गरज आहे. भविष्यातील धोका ओळखून शेतकरी साखर कारखान्यांकडे आमचा ऊस तोडून न्या अशी मागणी करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2012 रोजी प्रकाशित
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीउसाच्या मालमोटारींची तोडफोड सुरू केली असून पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच, मालमोटारींना पोलीस बंदोबस्त देण्यास सुरूवात केली आहे.
First published on: 17-11-2012 at 04:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violence from farmer organiser