सांगली : झालं, गेलं गंगेला मिळालं, आता माझ्या प्रचाराचे नेतृत्व विश्‍वजित कदम आणि विशाल पाटील यांनी करावे, असे आवाहन मविआचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी लोकसत्ताशी बोलताना केले.

पैलवान पाटील म्हणाले, उमेदवारीसाठी आग्रह धरणे कार्यकर्ता म्हणून ठीकच आहे. त्यांच्याबाबत माझ्या मनात कधीच कटुता नव्हती. जर मविआने काँग्रेसला उमेदवारी दिली असती तर मी खुल्या मनाने त्यांचा प्रचार करण्यासाठी पुढाकार घेतला असता. तशी कबुलीच मी पहिल्यावेळी झालेल्या पत्रकार बैठकीत दिली होती.

Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

मविआची उमेदवारी मला मिळाली असल्याने आता काँग्रेसचे विशाल पाटील व आमदार विश्‍वजित कदम यांनी खुल्या मनाने माझ्या प्रचारात सहभागी व्हावे, मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला पराभूत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन.

हेही वाचा – सोलापुरात भाजपचे राम सातपुते यांचा प्रचार मराठा आंदोलकांनी रोखला

हेही वाचा – मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत

मविआमधून ठाकरे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून लवकरच उमेदवारी दाखल करणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या तारखा निश्‍चित झाल्यानंतर उमेदवारीची वेळ निश्‍चित करण्यात येणार आहे. दि. १५ अथवा १९ मार्च रोजी उमेदवारी दाखल करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही पहिलवान पाटील यांनी सांगितले.