वर्धा-नांदेड-मार्गे यवतमाळ लोहमार्गास वाटाण्याच्या अक्षताच?

पश्चिम विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकरी व नागरिकांसाठी जीवनदायी, असा उल्लेख करण्यात येत असलेल्या वर्धा-नांदेड-मार्गे यवतमाळ या नवीन लोहमार्गाला गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात ज्या पध्दतीने तत्कालीन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या तोच कित्ता आता नवे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू लावणार की काय, या चच्रेला उधाण आले आहे.

पश्चिम विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकरी व नागरिकांसाठी जीवनदायी, असा उल्लेख करण्यात येत असलेल्या वर्धा-नांदेड-मार्गे यवतमाळ या नवीन लोहमार्गाला गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात ज्या पध्दतीने तत्कालीन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या तोच कित्ता आता नवे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू लावणार की काय, या चच्रेला उधाण आले आहे.
शिवसेना खासदार भावना गवळी यांनी, सदानंद गौडा यांना साकडे घालून ‘वर्धा-नांदेड-मार्गे यवतमाळ ’साठी ५०० कोटींची तरतूद करण्याची मागणी केली होती, पण ती अदखलपात्र ठरली. आता पुसद, उमरखेड, आर्वीच्या विविध संघटनांनी मोच्रे काढून ‘वर्धा-नांदेड-मार्गे यवतमाळ’ सह यवतमाळ-मूर्तीजापूर, पुलगाव-आर्वी, या ‘शंकुतलां’चा उध्दार करण्याची मागणी केली आहे. ‘वर्धा-नांदेड-मार्गे यवतमाळ’ हा प्रकल्प तीन वर्षांंत पूर्ण केला जाईल, अशी घोषणा तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यांनी यवतमाळमध्ये केली होती. आता ६ वर्षांनंतरही लोहमार्गाचे काम फक्त ३.७ टक्के झाले आहे.
२७० कि.मि.लांबीच्या प्रकल्पाचा खर्च तेव्हा २७४ कोटी ५५ लाख रुपये अपेक्षित होता. या प्रकल्पावर खर्च होणाऱ्या रकमेच्या ४० टक्के रक्कम राज्य सरकार आणि ६० टक्के रक्कम केंद्र सरकार खर्च करणार आहे. जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे, तर सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने विशेष असे कोणतेही प्रयत्न रेल्वे मंत्रालयाने केले नसल्याची कबुली शासनाने दिली आहे. उपलब्ध असलेला निधी लक्षात घेऊनच प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असल्याचेही सरकारने मान्य केले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, आता जनताच रस्त्यावर आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wardha nanded yavatmal railway track

ताज्या बातम्या