आदिवासींच्या कलावस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध

अमरावती : मेळघाट आणि मध्यप्रदेश सीमेलगतच्या आदिवासी संस्कृ तीची ओळख करून देणे तसेच आदिवासींच्या कलावस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘मेळघाट हाट’ या प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग खुला झाला असून अमरावती शहरात मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक विक्री केंद्र, माल साठवणुकीसाठी गोदाम, वाहतूक व्यवस्था, हरिसाल, धारणी, सेमाडोह व चिखलदरा येथे उत्पादने व संकलन केंद्रे अशी या ‘हाट’ची रचना असणार आहे. मेळघाटात २ हजार ३५९ महिला स्वयंसहायता गट असून, २५ हजारांहून अधिक  सदस्य त्यात सहभागी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेळघाटातील आदिवासी महिला बचत गटांनी उत्पादित के लेल्या वस्तूंच्या विक्री व विपणनासाठी ‘मेळघाट हाट’चे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. या वस्तूंचा ‘ब्रँड’ विकसित होण्यासाठी अधिक संशोधन व परिपूर्ण नियोजन करावे लागणार आहे. बांबूत रोजगार निर्मिती करून आदिवासी समुदायांना समृद्ध करण्याची आर्थिक क्षमता आहे. बांबूच्या विविध कलावस्तूंना देशासह परदेशातही मागणी आहे. मेळघाटात बांबूपासून कलाकु सरीच्या आणि विविध उपयोगी वस्तू तयार करणारे कामगार आहेत. याशिवाय अनेक कलावस्तू मेळघाटात तयार होतात, पण त्याला बाजारपेठ मिळत नाही, अशी खंत व्यक्त के ली जात होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून योग्य व्यासपीठ उपलब्ध होऊ शके ल, अशी अपेक्षा व्यक्त के ली जात आहे.

नियोजित प्रकल्पाबाबत सादरीकरण व चर्चेसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ‘माविम’चे जिल्हा समन्वयक सुनील सोसे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.

मेळघाट महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्यात विभागला गेला आहे. मध्यप्रदेशातील उत्पादने, वैशिष्टय़े, स्वरूप यांचाही विचार प्रकल्पात के ला जाणार आहे. मेळघाटच्या पारंपरिक उत्पादनांचा समावेशही त्यात राहणार असून मेळघाटातील विविध खाद्यपदार्थ आणि कलावस्तूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. महिला बचत गटांच्या सदस्यांना आर्थिक बाबींचे प्रशिक्षण मिळवून देण्याची आवश्यकता आहे, असल्याचे मेळघाट प्रकल्प अधिकारी मीताली सेठी यांनी सांगितले.

मेळघाटात स्थानिक महिला भगिनींना रोजगार मिळवून देण्यासाठी बचत गटांचे जाळे निर्माण करण्यात आले. या भगिनींकडून अनेक उत्कृष्ट उत्पादने निर्माण होतात. त्यात विविधता आणणे, या नैसर्गिक उत्पादनांची वैशिष्टय़े जगापुढे आणणे व विपणनाचे जाळे भक्कम करणे यासाठी ‘मेळघाट हाट’चा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. मेळघाटचा ‘ब्रँड’ जगभर पोहोचण्यासाठी विपणन पद्धतीचे अधिकाधिक संशोधन करून, अभिनव संकल्पना राबवल्या पाहिजेत.

यशोमती ठाकूर, पालकमंत्री, अमरावती.

वस्तूंच्या विक्रीसाठी एक ‘मॉल’ उभारला जाणार आहे.  या ‘मॉल’चे संचालन संपूर्णत: महिलांद्वारे करण्यात येईल. विविध गृहोपयोगी, हस्तनिर्मित कला वस्तू, खाद्यपदार्थ, धान्य, सेंद्रिय ताजा भाजीपाला, फळे, वनौषधी आदी उपलब्ध असेल. ‘महिला बचत गट आपल्या दारी’ उपक्रमात घरपोच सेवेबरोबर ऑनलाईन विक्रीही होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Way build melghat haat is wide ssh
First published on: 29-06-2021 at 00:31 IST