राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३८ झाल्याची राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच केंद्र सरकारने जारी केलेल्या सात करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला असून. यामध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबियातून येणाऱ्यांचीही चाचणी घेतली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

करोनाग्रस्त देशांमधून येणाऱ्या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. “दहा करोनाग्रस्त देशांमधून येणाऱ्या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे,” असं टोपे यांनी सांगितलं. नक्की हे वर्गिकरण कसे असणार आहे याबद्दलही टोपे यांनी माहिती दिली. जाणून घेऊयात कसं होणार हे वर्गीकरण…

ए –
ए म्हणजे ज्यांच्यामध्ये थेट करोनाची लक्षणे दिसत आहेत असे प्रवासी. त्यांना थेट आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवणार आहोत. त्यांच्या चाचण्या करुन त्याप्रमाणे त्यांच्यावरील उपचारांचा निर्णय घेण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बी –
बी मध्ये वयोवृद्ध लोकं आहेत. ज्यांना मधुमेह किंवा इतर आजारांचा त्रास आहे त्यांचा बी प्रकारामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या चाचण्या करुन काही अढळल्यास पुढील उपचार त्यांच्यावर करण्यात येतील.

सी –
सी मध्ये तरुण मुले ज्यांच्यामध्ये कुठलीही लक्षणे नाहीत. त्यांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना होम क्वॉरंटाइन केले जाईल.