भाजपाची पाचवी यादी रविवारी जाहीर झाली आहे. या यादीत १११ जणांची नावं आहेत. विशेष बाब म्हणजे या यादीत महाराष्ट्रातली तीन नावं आणखी आहेत. ४८ जागांपैकी महाराष्ट्रात भाजपाने २३ जागांवर दावा सांगितला आहे. सोलापूर मतदारसंघातून राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते असा सामना लोकसभा निवडणुकीत रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना उद्देशून पत्र लिहिलं. या पत्राला आता राम सातपुतेंनी उत्तर दिलं आहे.

प्रणिती शिंदेंचं पत्र काय?

मा. राम सातपुते जी,
‘आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो की बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच तुम्हाला या उमेदवारीच्या निमित्ताने शुभेच्छा देते.’

pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
teacher dancing viral video
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
Supreme court Justince Bhushan Gavai
“सरकार आणि कार्यकारी मंडळ अपयशी ठरत असताना…”, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे मोठे विधान

‘लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि मतदारसंघाचा विकसा हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे. पुढील ४० दिवस भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई एकमेकांविरोधात लढत राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते.’

हे पण वाचा- सोलापुरात भाजपचे राम सातपुते उमेदवार; प्रणिती शिंदेंचे आव्हान पेलणार ? दोन युवा आमदारांमध्ये लढत

‘सोलापूरकरांच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि शुभेच्छा देते.’

प्रणिती सुशीलकुमार शिंदे

या पत्राला राम सातपुते यांनीही पत्र लिहूनच उत्तर दिलं आहे. राम सातपुतेंनी लिहिलेल्या या पत्राचीही चर्चा रंगली आहे.

काय आहे राम सातपुतेंचं पत्र?

आ. प्रणिती शिंदेजी,
जय श्रीराम

मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतो आहे. मी आमदार झाल्यापासून आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परिने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय.

मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढी वर्षे राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेने आता चांगलंच ओळखलं आहे.

राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामागराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भाजपाने जो विश्वास दाखवला आहे, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करुन सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. वंदे मातरम

आपला विनीत,
राम सातपुते

असं पत्र आता राम सातपुते यांनी प्रणिती शिंदेंना उद्देशून लिहिलं आहे. ज्याचीही चर्चा चांगलीच होऊ लागली आहे.