मराठी भाषा बोलता तुम्ही, मग मराठी संस्कृती सारखे कपडे का नाही घालत, आपण वेस्टनायझेशन सर्व गोष्टींच करतोय, दिवाळी असली की ते तयार हून येतात, आत्मनिर्भर भारत, मग चॅनलवर आत्मनिर्भर महाराष्ट्र का नाही? चॅनलमधील मुली साडी का नाही नेसत, शर्ट आणि ट्राउझर का घालतात?, असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्या या पिंपरी- चिंचवडमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होत्या.

हेही वाचा- “राज्यपालांना सद्‌बुद्धी लाभो”; शिवरायांबाबत केलेल्या विधानावरून अजित पवारांचं टीकास्र; म्हणाले “पंतप्रधान मोदींनी…”

एवढं सगळं मराठी मराठी चाललं आहे, ते नियम काय फक्त आम्हाला? ,तुम्हाला कुठलेच नाहीत. लेट्स स्टार्ट विथ बेसिक्स…मराठी भाषा त्याचा कन्टेन्ट, त्याच्यावर एक, एक गोष्ट, आमची बुद्धिमत्ता इतकी कमी नाही, हुशार नाही आम्ही, पत्रकार हा फॅशन आयकॉन नाही, आम्ही ही नाही. मी तुमच्यावर टीका करत नाही. आम्ही ही फॅशन आयकॉन नाहीत. सोशल मीडियात आपण वाहत चाललो आहोत, आपण कधी त्याला रिजेक्ट करणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कोणतीतरी अदृश्य यंत्रणा मीडिया कंट्रोल करते आणि ती पार्लमेंटमध्ये ठरवते की चर्चा कोणत्या विषयावर केली जाणार.

हेही वाचा- कोश्यारींच्या शिवाजी महाराजांवरील विधानानंतर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले ” बुद्धी भ्रष्ट…”

पत्रकार मला विचारतात तुमचं यावर मत काय पण मला प्रत्येक गोष्टीवर मत द्यायच नाहीये. मी काही उलटसुलट बोलले असते तर शंभर टक्के याची बातमी झाली असती आणि वर्षभर चालली असती. मराठी बाईने हे उत्तर देण योग्य आहे का. ही मराठी संस्कृती आहे का? वगैरे वगैरे. मी लहानपणपासून टाईम्स ऑफ इंडिया वाचत आली आहे. या पेपरमुळेच मी इंग्रजी शिकले. मात्र, आता मला टाईम्स ऑफ इंडियाला फोन करुन सांगावं लागते की तुमचा हा शब्द चुकला आहे. मी माझ्या मुलांना पेपरमधल्या कोणत्या बातम्या वाचायच्या आणि कोणत्या नाही हे सांगते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.