स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. आता महाविकास आघाडीतील काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या तर शिवसेनेनेही राहुल गांधींच्या वक्तव्यावर असहमती दर्शवली आहे. मनसेनेही राहुल गांधीविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, शेगावमधील त्यांची सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीसांनीही आव्हान दिलेलं आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; चिखली नाक्यावर कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अशा लोकांवर कारवाई करून काही फायदा नसतो, अनेक केसेस यापूर्वीही ते भोगत आहेत. ते तसेही बेलवरच आहेत. अनेकवेळा कोर्टात हजर राहत नाहीत, म्हणून त्यांचे वॉरंट निघतात. एवढंच आहे की ते जे खोटं बोलत आहेत, त्याचं उत्तर मात्र आम्ही निश्चितपणे देऊ आणि मला असं वाटतं की बहुदा प्रसारमाध्यमांकडून आपल्याला जास्त प्रसिद्धी मिळावी, सुरुवातीला त्यांच्या यात्रेला प्रसारमाध्यमांकडून जास्त प्रसिद्धी मिळत नव्हती. ती जास्त मिळावी म्हणून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.” टीव्ही 9 शी ते बोलत होते.

हेही वाचा – “ते गळे काढणार…मुंबई आमची, मुंबई आमची…, तिजोरी भरणार बिल्डर, कंत्राटदार आणि बारवाल्यांची”

याचबरोबर “एकप्रकारे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे सुरू आहे. मी एवढच सांगतो की, ते हे जे काही करत आहेत त्या संदर्भात कायद्याच्या चौकटीत राहून जर त्यांनी काही केलं तर ठीक आहे. पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर त्यांनी काही केलं. तर त्यावर कारवाई आम्हाला करावी लागेल. बाकी त्यांची यात्रा सुरू आहे आम्ही सुरक्षा दिली आहे. सुरक्षितपणे आम्ही त्यांची यात्रा बाहेर काढू पण महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.” असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय “त्या वक्तव्यानंतर लोकांमध्ये १०० टक्के नाराजी आहे. कारण, रोज इतकं खोटं बोलायचं १३-१४ वर्षे ज्यांनी काळा पाणी आणि तुरुंगवासाची शिक्षा भोगली, त्यांच्याबद्दल अशाप्रकारे ज्यांनी पायरीदेखील पाहिली नाही, अशा लोकांनी बोलावं? हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात फार मोठा राग आहे.” असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.