जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिलेला नाही, त्यामुळे भाजापाचे सरकार राज्यात येता कामा नये हा त्यातील प्रमुख निष्कर्ष आहे. सध्या जे काही पर्याय समोर आहेत, त्यावर विचार करूनच निर्णय घेतला जाईल. मात्र, शिवसेना काय भूमिका घेते हे महत्वाचे ठरणार आहे. शेवटी शिवसेनेने निर्णय घेतल्यानंतरच राज्यात सत्ता परिवर्तन होऊ शकतं, ही आजची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते यावर बरच काही अवलंबून आहे. बिगर भाजपाचं सरकार राज्यात येणं हीच काँग्रेसजनांची मानसिकता आहे.

तसेच, भाजपाने महायुतीमधील सहकारी पक्षांना विश्वासात न घेतल्यामुळे राज्यात आज ही परिस्थिती ओढावली आहे. यामुळे शिवसेना अस्वस्थ झाली व त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जोपर्यंत शिवसेना युतीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत यावर तोडगा निघणार नाही, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवरच काँग्रेसचा एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याचेही बोलले जात आहे.

राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरून जोरादार हालचाली सुरू आहेत. भाजपा व शिवसेना दोन्ही पक्ष आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. शिवाय विविध मार्गांचा अवलंब करून एकमेकांवर दबाव देखील आणला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना सरकार स्थापन करणार असल्याचा चर्चा सुरू आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राला लवकरच गोड बातमी मिळेल असे म्हणाले होते. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही ती गोड बातमी आहे असेही राऊत यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार उद्या राज्यापालांची भेट घेणार आहेत.