करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून या आजाराचे बाधित रुग्ण आपल्या पुण्याही  आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण काळजी घेताना दिसत आहे. याच दृष्टीने हडपसर येथील एक महिला मास्क आणण्यासाठी मेडिकल मध्ये गेली असताना तिच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी तिच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख ६ हजार असा ४६ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील इंद्रप्रस्थ सोसायटी मध्ये राहणारी महिला असून ती मास्क आणण्यासाठी मेडिकलमध्ये गेली होती. त्याच वेळी चोरटय़ांनी तिच्या घरात घुसून घरातील सोन्याची तीन वेढणी, एक सोन्याची अंगठी आणि रोख 6 हजार असा मिळून जवळपास ४६ हजारांच्या चोरीची घटना घडली आहे. ही घटना संबधित महिला घरी आल्यावर, दरवाजा उघड असल्याचे दिसताच. त्यांनी घरात जाऊन पाहिल्यावर घरातील सर्व अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. आपल्या घरात चोरीची घटना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबधित महिलेने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे हडपसर पोलिसानी सांगितले. या प्रकरणातील चोरट्यांचा तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman went for mask purchase thieves theft ornaments and cash from her home in pune scj 81 svk
First published on: 13-03-2020 at 15:21 IST