सोलापूर : यापूर्वी सर्रास विषारी ताडीची विक्री झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी शासनानेच बंदी घातलेली ताडी विक्रीसाठी पुन्हा शासनाने परवाने दिले आहेत. त्यास सार्वत्रिक विरोध होत आहे. याच मुद्दय़ावर महिला विडी कामगारांनीही रस्त्यावर उतरून राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यासमोर तीव्र निदर्शने केली.

अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी येथील गोदुताई परुळेकर विडी घरकुलात हजारो विडी कामगारांच्या कुटुंबीयांना ताडी विक्रीचा प्रचंड त्रास होणार आहे. या विषारी ताडीमुळे आजमितीस शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. व्यसनाधीन तरुणांमुळे ऐन तारुण्यात महिलांच्या नशिबी वैधव्य आले आहे. काही वर्षांपूर्वी ताडी विक्रीच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात तक्रारी आल्यामुळे सर्व ताडी विक्री केंद्रे शासनाच्या आदेशानुसार बंद होती. त्यानंतर आता पुन्हा अचानकपणे शासनाने ताडी विक्रीसाठी परवाने दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी ताडी विक्री अधिकृतपणे सुरू होऊ शकते. विकली जाणारी ताडी शुध्द नसते. तर रासायनिक द्रव्यांची भेसळ करून कृत्रिमपणे ताडी तयार केली जाते. ही ताडी विषारी, आरोग्याला घातक आणि जीवघेणी असल्याचा आक्षेप घेतला जातो.

Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
ST buses
एसटीच्या मार्गात आचारसंहितेचा अडथळा
High Court decision, Accused, Seek Bail, Next Day, Authorities, Refuse Prosecution, under MoCCA,
आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार

या पार्श्वभूमीवर गोदूताई परूळेकर घरकुलातील महिला विडी कामगार ताडी विक्रीच्या विरोधात एकवटल्या आहेत. या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. लोकप्रतिनिधींसह सामान्य जनतेचा, कामगारांचा विरोध डावलून ताडी विक्री झाल्यास प्रखर आंदोलन करण्याचा इशारा आडम यांनी यावेळी बोलताना दिला. सिटूचे राज्य महासचिव एम.एच.शेख यांनीही या आंदोलनाचे नेतृत्व केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या आंदोलनात सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, उमा मागनूर, रत्नाबाई सुर्रे, संगीता एडके, निलोफर शेख, आरीफा शेख, युसूफ शेख, विल्यम ससाणे, अनिल वासम, वसिम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, बापू साबळे, फातिमा बेग, हसन शेख, मुरलीधर सुंचू, नरेश गुल्लापल्ली, डेव्हिड शेट्टी, कुर्मेश म्हेत्रे, अंजप्पा म्हेत्रे, सुरेश गुजरे, बालाजी तुम्मा, नागनाथ जल्ला, देवपुत्र सायाबोळू, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, महिबूब गिरगावकर आदींनी भाग घेतला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.