पीडिताच्या पत्नीच्या जागी दुसरीच महिला..

किडनी तस्करीप्रकरणी अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे.

किडनी तस्करीप्रकरणी अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. एका किडनी पीडिताची दुसरीच पत्नी दाखवून तिचे बनावट मतदार कार्ड तयार करण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने रविवारी एकाला अटक केली. किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी देवेंद्र शिरसाट हा ३० डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. मुख्य सूत्रधार शिवाजी कोळी, आनंद जाधव व विनोद पवार कारागृहात आहेत. दलालांच्या माध्यमातून गरजूंना हेरून किडनी विक्री करण्यात आले. हे प्रकरण उघडकीस न येण्यासाठी आरोपींकडून पूर्ण दक्षता घेण्यात आली. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात बोगस कागदपत्रे तयार करण्यात आले, असाच धक्कादायक प्रकार रविवारी पोलीस तपासात समोर आला. आरोपी देवेंद्र शिरसाटने किडनीदाता संतोष कोल्हटकर यांच्या पत्नीऐवजी दुसरीच महिला उभी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Womens second wifes place