रामेश्वर रुईमध्ये उद्यापासून राज्य महा-वीर कुस्ती स्पर्धा

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी (पुणे) व राज्य कुस्तीवीर परिषद (पुणे) यांच्या वतीने लातूर तालुक्यातील रामेश्वर रुई येथे दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय कुस्ती महा-वीर स्पर्धेचे रविवारी (दि. २३) व सोमवारी आयोजन करण्यात आले आहे.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी (पुणे) व राज्य कुस्तीवीर परिषद (पुणे) यांच्या वतीने लातूर तालुक्यातील रामेश्वर रुई येथे दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय कुस्ती महा-वीर स्पर्धेचे रविवारी (दि. २३) व सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. संत एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून या स्पर्धा आयोजित केल्याची माहिती विश्वशांती केंद्र व माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी दिली.
रविवारी दुपारी ३ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महानिदेशक मुकेश शर्मा प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. िहदकेसरी श्रीपती खंचनाळे, गणपत आंदळकर, दीनानाथसिंग, जगदीश कालिरमण व अमोल बराटे, तसेच भारतकेसरी दादू चौगुले उपस्थित राहणार आहेत. स्पध्रेस देशभरातील नामवंत मल्लांना निमंत्रित केले आहे. सर्वोत्तम कुस्तीगीराला महाराष्ट्र कुस्ती महा-वीर किताब, सन्मानपत्र, चांदीची गदा व रोख ५१ हजार रुपये देऊन गौरविण्यात येईल. इतर विविध वजनगटांतील विजेत्या मल्लांना बक्षिसे देण्यात येतील. योगमहर्षी शेलारमामा यांच्या स्मृत्यर्थ ७५ वर्षांच्या पुढील मल्लांसाठी याच दिवशी आगळीवेगळी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्यांना योगमहर्षी शेलारमामा स्मृती सुवर्ण, रौप्य व कांस्य गौरवपदक बहाल करण्यात येईल. ५० ते १२० किलो वजनगटांत या स्पर्धा होणार आहेत. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता बक्षीस वितरण होईल. स्पध्रेत सहभागासाठी कोणतेही शुल्क नाही. मात्र, स्पर्धा कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार घेण्यात येईल. रमेशअप्पा कराड, डॉ. एस. एन. पठाण आदी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Wrestling competition in rameshwar rue

ताज्या बातम्या