शहरातील येवले चहा विक्री केंद्राच्या कोंढव्यातील उत्पादन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) मंगळवारी कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्या केंद्रातून शहरातील येवले चहाच्या हॉटेलमध्ये पुरविण्यात येणारी चहा पावडर, तसेच चहा मसाल्याचे उत्पादन थांबविण्याचे आदेश देण्यात आले. अन्न व सुरक्षा मानके कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणावर येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

“आरोग्यासाठी हानिकारक असलेला ‘मेलानाईट’ नामक पदार्थ आमच्या चहामध्ये आढळला असे म्हटले जात आहे. परंतु या विधानांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. एफडीएचे अधिकारी जेव्हा आमच्या हॉटेलमध्ये तपास करण्यासाठी आले तेव्हा आमच्या पॅकिंगमध्ये त्यांना काही त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आमच्यावर कारवाई केली” असा दावा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून नवनाथ येवले यांनी केला आहे.

याआधी ‘एफडीए ’कडून करण्यात आलेल्या कारवाईत सहा लाखांचा माल जप्त करण्यात आला होता. त्याचे नमुने राज्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. येवले चहामध्ये आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या ‘मेलानाईट’ या पदार्थाचा वापर केला जात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत तेथून चहा पावडर, चहा मसाला, साखरेचे पुडे जप्त करण्यात आले. पुडय़ांवर उत्पादन दिनांक तसेच अन्य काही माहिती लावणे बंधनकारक आहे. मात्र, जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पुडय़ांवर कोणताही उल्लेख नसल्याचे उघडकीस आले. एफडीएचे सहाय्यक आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती.