Eknath Shinde Dasara Melava 2023 Marathi News : आझाद मैदानातून दसरा मेळाव्याला सुरुवात होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर तोफ डागायला सुरुवात केली. “५० खोके, एकदम ओके” असा आरोप शिंदे गटावर झाला आहे. या टीकेवरून त्यांनी ठाकरे गटाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, रक्ताचं नातं सांगण्याऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला. त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी आहे. त्यांनी कोणतीही सीमा ठेवली नाही. निर्लज्जपणाचा कळस गाठला. आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर त्यांनी शिवेसनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये बँकेकडे मागितले. पण ५० कोटी द्यायला बँकेने नकार दिला. बँक म्हणाली निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेना दिली आहे. त्यामुळे ठाकरेंनी निर्लज्जपणे पत्र पाठवले. तुम्ही आमच्यावर ५० खोक्यांवर आरोप करता आणि ५० खोके आमच्याकडेच मागता. या एकनाथ शिंदेने क्षणाचाही विलंब न लावता ५० कोटी द्यायला लावले.”

“मी सांगितलं यांचं प्रेम बाळासाहेबांवर नाही, विचारांवर नाही. पण खोके आणि ओके मी बोलणार नाही. कारण खोके त्यांना पुरत नाहीत. त्यांना जवळून ओळखणारे म्हणाले की यांना खोके चालत नाही, यांना कंटेनर पाहिजे. त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो. योग्य वेळेला बोलेन”, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तर यात आश्चर्य वाटालयाल नको. त्या पापात आपण सहभागी नाही हे समाधान आहे. बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायचे त्यांना हे डोक्यावर घेऊन फिरत आहेत”, अशीही टीका त्यांनी केली.