VIDEO : अमरावतीमधील तरुणाने घराजवळच केली गांजाची शेती; पोलीस पाहणीला पोहचले अन्…

गांजाची शेती करणाऱ्या व गांजा विकणाऱ्या दोन्ही आरोपींच्या धामणगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

ganja
दहा किलो गांजा जप्त

घराशेजारी ज्या जागेत परसबाग फुलवली जाते त्याच जागेत चक्क गांजाची रोप लावल्याचे प्रकरण अमरावती जिल्ह्यात समोर आले आहे. मात्र पोलिसांच्या नजरेतून ही बाब सुटू शकली नाही. गांजाची शेती करणाऱ्या व गांजा विकणाऱ्या दोन्ही आरोपींच्या धामणगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी दहा किलो गांजा देखील जप्त करण्यात आला आहे. 

दत्तापुर धामणगाव येथील आठवडी बाजार परिसरात राहणाऱ्या शेख इस्माईल शेख बाबा या आरोपीने घराशेजारच्या रिकाम्या जागेत जेथे परसबाग लावली जाते तिथे चक्क गांजाची रोप लावल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली तसेच धामणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाघोली येथील नंदू जयस्वाल नामक युवक गांजा विक्री करत असल्याची मिळालेल्या माहितीवरून चांदुर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांनी आज दोन्ही ठिकाणी छापा टाकला. यामध्ये या दोन्ही आरोपीकडून दहा किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे धामणगाव परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Young man from amravati planted cannabis garden near house both accused arrested srk

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या