‘राजा नटवरलाल’ या आपल्या आगामी चित्रपटातून आपल्या नेहमीच्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येण्यास अभिनेता इमरान हाश्मी सज्ज असला तरी, ‘मसाला’ चित्रपटांमध्ये इमरानने काम केलेले पत्नीला आवडत नसल्याचा खुलासा खुद्द इमरानने केला.
चित्रपटात मनोरंजनाचा ताळमेळ राखण्यासाठी रोमान्स, ड्रामा, अॅक्शन, संगीत इ. गोष्टींवर भर देणे गरजेचे असल्याचे मत इमरानने व्यक्त केले.
पाहा ‘राजा नटवरलाल’चा ट्रेलर
इमरान म्हणाला की, “माझ्या पत्नीला मी मसाला चित्रपट केलेले अजिबात आवडत नाही. परंतु, समोर टेबलावर जे वाढले असेल ते खावे अशा उक्तीनुसार अभिनेत्याला चित्रपट करावे लागतात आणि हा माझ्या व्यवसायाचा भाग असल्यामुळे चित्रपटांमध्ये मला ‘किसींग सीन’ करावीच लागतात.” असेही इमरान म्हणाला.
मागील वर्षी इमराने मसाला चित्रपटांना बगल देत ‘एक थी डायन’ आणि ‘घनचक्कर’ सारखे चित्रपट केले होते. परंतु, तिकीटबारीवर हे दोन्ही चित्रपट ‘नापास’ ठरताना दिसले.
यावर इमरानने, “या चित्रपटांमुळे मी अजिबात दु:खी नाही उलट, एक अभिनेता म्हणून माझा आवाका वाढविण्याची संधी यातून मला मिळाली होती. यापुढेही मसाला आणि वास्तवदर्शी अशा दोन्ही चित्रपटांमध्ये काम करणे मी सुरूच ठेवीन.” असेही तो म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2014 रोजी प्रकाशित
‘मसाला’ चित्रपटांत काम केलेले पत्नीला आवडत नाही- इमरान हाश्मी
'राजा नटवरलाल' या आपल्या आगामी चित्रपटातून आपल्या नेहमीच्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येण्यास अभिनेता इमरान हाश्मी सज्ज असला तरी, 'मसाला' चित्रपटांमध्ये इमरानने काम केलेले पत्नीला आवडत नसल्याचा खुलासा खुद्द इमरानने केला.

First published on: 18-07-2014 at 06:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emraan hashmi my wife doesnt like me doing masala films