18 January 2021

News Flash

रियाला अटक : “न्यायाची थट्टा चालवली आहे, तीन केंद्रीय यंत्रणा एका महिलेची…”

"तीन केंद्रीय तपास यंत्रणा एका महिलेचं शोषण करतायेत, कारण..."

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आज अमली पदार्थविरोधी विभागानं अटक केली. अमली पदार्थांच्या तस्करांची तस्करी व खरेदी प्रकरणात नाव आल्यानंतर रियाची चौकशी सुरू करण्यात आली होती. रियाला अटक झाल्यानंतर तिच्या तीन केंद्रीय  वकिलांनी खंत व्यक्त केली आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करी व सेवन प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागानं तपास सुरू केली होता. २८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केले. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते.

आणखी वाचा- रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

मागील तीन दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी रियाची चौकशी सुरू होती. आज (८ सप्टेंबर) तिला अटक करण्यात आली. रियाला अटक झाल्यानंतर तिच्या वकिलांनी खंत व्यक्त केली. “न्यायाची थट्टा चालवली आहे. तीन केंद्रीय तपास यंत्रणा मिळून एका महिलेची पिळवणूक करत आहेत, कारण ती अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या प्रेमात होती. ज्याला अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या समस्येनं ग्रासलं होतं. जो मुंबईतील पाच अग्रगण्य मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होता. ज्याने बेकायदेशीर औषधी आणि ड्रग्जचं सेवनातून आत्महत्या केली,” अशी खंत रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा- ‘आज रात्री दिवाळी साजरी होणार’; रियाच्या अटकेनंतर चेतन भगत यांचं ट्विट

आणखी वाचा- “देव आमच्या सोबत आहे”; रियाच्या अटकेनंतर सुशांतच्या बहिणीचं ट्विट

अटकेसाठी रियानं आधीच दर्शवली होती तयारी

प्रेम करणे गुन्हा असेल, तर या गुन्ह्यासाठी कोणतेही परिणाम भोगण्यास रिया तयार आहे. निर्दोष असल्याने तिने अटक टाळण्याचा प्रयत्न केलेला नाही. ती स्वतः अटक करून घेण्यासही तयार आहे, असं रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी यापूर्वीच सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 4:45 pm

Web Title: 3 central agencies hounding a single woman just because she was in love with a drug addict bmh 90
Next Stories
1 “काही लोक स्वत:ला शेरलॉक होम्स समजतात”; आणखी एका अभिनेत्रीचा रिया चक्रवर्तीला पाठिंबा
2 अक्षयची पत्नी मोठी स्टार का नाही? ट्विंकलने मीम्स शेअर करत सांगितलं कारण
3 झी टॉकीजचा विशेष चित्रपट महोत्सव
Just Now!
X