27 October 2020

News Flash

“मन्नत’मध्ये एक खोली भाड्याने हवी’; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करताना दिसतो. परंतु अनेकदा या पोस्टमुळे त्याला नेटकऱ्यांच्या काही चित्रविचित्र प्रश्नांना देखील तोंड द्यावे लागते. असाच एक प्रसंग शाहरुखच्या बाबतीत नुकताच घडला.

अवश्य वाचा – आयुषमान खुरानाने केला बॉयफ्रेंडला किस; व्हिडीओ व्हायरल..

अवश्य वाचा – सर्वाधिक कमाई करणारी २० वर्षीय अभिनेत्री

कुठला प्रश्न शाहरुखला विचारला गेला?

अवश्य वाचा – ‘त्या’ पदार्थांच्या सेवनामुळे नसिरुद्दीन शाह असे बरळतात – अनुपम खेर

तुफान का देवता या ट्विटर हँडलवरुन शाहरुखला “तुझा मन्नत बंगल्यामध्ये एक खोली भाड्याने हवी आहे, किती रुपयांना मिळेल?” असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्याने अगदी गंमतीदार उत्तर दिले. क्षणाचाही विलंब न करता शाहरुख म्हणाला “३० वर्षांच्या परिश्रमावर खोली मिळेल.” शाहरुखने दिलेली ही गंमतीदार प्रतिक्रिया सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

शाहरुखला सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाविषयी नेटकरी सातत्याने प्रश्न विचारत आहेत. त्यावेळी एका नेटकऱ्याने हा अजब प्रश्न शाहरुखला विचारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 1:15 pm

Web Title: a fan enquire about the rent of a room in shah rukh khans mannat mppg 94
Next Stories
1 ‘तान्हाजी’मधील रायबा आहे लोकप्रिय बालकलाकार; जाणून घ्या त्याच्याविषयी
2 अशा महिलांच्या पोटीच बलात्कारी जन्म घेतात; कंगना रणौतचं वादग्रस्त विधान
3 ऐन लग्नात नितू आणि ऋषी कपूर दोघेही पडले होते बेशुद्ध
Just Now!
X