News Flash

‘ए फ्लाईंग जट’मधूनही अरिजित बाहेर…

निर्मात्यांना त्या गाण्यासाठी अरिजितपेक्षा आतीफचा आवाज जास्त आवडला

अरिजित सिंग

सगळं काही आलबेल चालू असताना अचानक काही वाद घडतात आणि नंतर सगळ्याच गोष्टी बिकट होऊन बसतात. असा अनुभव अनेकांना येत असेल. पण सध्या याच मनःस्थितीतून अरिजित सिंग जातोय. सलमान खानबरोबर झालेल्या वादामुळे सुलतानमधले त्याचे गाणे जाणीवपूर्वक काढल्यानंतर आता टायगर श्रॉफचा आगामी सिनेमा ए फ्लाईंग जट मधल्या गाण्यातूनही त्याला वगळण्यात आले आहे. त्याच्याऐवजी पाकिस्तानी गायक आतीफ अस्लम याची वर्णी त्या गाण्याला लागली.
‘मिड-डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, “निर्मात्यांना त्या गाण्यासाठी अरिजितपेक्षा आतीफचा आवाज जास्त आवडला. त्यामुळे शेवटच्याक्षणी आतीफची निवड करण्यात आली. या एका गाण्यासाठी आतीफला सुमारे ३५ लाख रुपये देण्यात आले. १५ दिवसांनी हे गाणं पाहता येणार आहे. याशिवाय सिनेमाचा प्रमोशनल ट्रॅकही त्यानेच गायला आहे.”
ए फ्लाईंग जटचे संगीतकार सचिन- जिगर यांनी अरिजितला कधी या गाण्यासाठी घेतलेच नव्हते. त्यामुळे या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले.
सुलतान सिनेमाच्यावेळीही सलमान खानबरोबर झालेल्या वादातून ‘जग घूमेया’ हे गाण त्याच्याकडून राहत फतेह अली खान यांच्याकडे गेले होते.
रेमो डिसोझा दिग्दर्शित ए फ्लाईंग जट हा सुपर हिरो सिनेमा येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून, यात टायगर श्रॉफ, जॅकलिन फर्नांडिस आणि अमृता सिंग यांनी काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 5:14 pm

Web Title: a flying jatt arijit sigh song rejected again for another version by atif aslam
Next Stories
1 मराठी चित्रपट निर्मितीत जॉन अब्राहमचे पदार्पण…?
2 विन डिझेलसोबत दीपिकाची धम्माल मस्ती..
3 सनी लिओनीची ‘फॅनगिरी’ पाहून तुम्हीही चकीत व्हाल!