अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा अखेरचा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण सुशांतच्या आठवणीत भावूक झाले आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी देखील ‘दिल बेचारा’ चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. या चित्रपटाने २ हजार कोटींची ओपनिंग केली असं ते म्हणाले.

अवश्य पाहा – मृत्यूनंतर सुशांत ट्विटरवर आलिया भट्टला फॉलो करतोय? कंगनाने विचारला प्रश्न

“सुशांत सिंह राजपुतच्या दिल बेचारा या चित्रपटाला २४ तासांत ९५ दशलक्ष व्हूज मिळाले. याचाच अर्थ या चित्रपटाने २ हजार कोटींची ओपनिंग केली.” अशा आशयाचं ट्विट करुन ए. आर. रेहमान यांनी सुशांतचं कौतुक केलं. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – “सलमानच्या घरात तीन महिने राहिल्यानंतर…”; अभिनेत्याने उडवली जॅकलीनची खिल्ली

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सिनेमागृह बंद आहेत. परिणामी ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुशांतसोबत नवोदित अभिनेत्री संजना सांघीने स्क्रीन शेअर केली असून तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांना भावला आहे. १ तास ४१ मिनीटांच्या या चित्रपटाला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीने देखील १० पैकी १० रेटिंग दिलं आहे.